19.5 C
New York
Thursday, September 18, 2025

Buy now

कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवर लावलेल्या अनधिकृत भोंग्यावर कारवाई करावी – आ. निलेश राणे

कुडाळ ( मयुर ठाकूर ): कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवर लावलेल्या अनधिकृत भोंग्यावर कारवाई करावी अशी आ. निलेश राणे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पोलिस निरीक्षक कुडाळ यांच्याकडे सुपूर्त केले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, सध्या धार्मिक स्थळांवर लावलेले अनधिकृत भोंगे आणि त्यावरून होणारे ध्वनीप्रदूषण हा कळीचा मुद्दा बनला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने ध्वनीप्रदूषणाविषयी नियमावली निश्चित केली आहे. त्यामध्ये शांतता क्षेत्रात रात्री ४० तर दिवसा आवाजाची मर्यादा ५० डेसिबल इतकी असावी. निवासी क्षेत्रात आवाजाची मर्यादा रात्री ४५ तर दिवसा ५५ डेसिबलपर्यंत असावी. वाणिज्य क्षेत्रात हीच मर्यादा रात्री ५५ तर दिवसा ६५ डेसिबलपर्यंत आहे आणि औ‌द्योगिक क्षेत्रात आवाजाची मर्यादा रात्री ७० तर दिवसा ७५ डेसिबल इतकी आहे. असे असले तरी धार्मिक स्थळांवर कायमस्वरुपी लावलेले भोंगे प्रत्यक्षात लावलेल्या ठिकाणी ही आवाजाची मर्यादा पाळत नाहीत.

भोंगे लावल्याने कायद्याचे उल्लंघन होत नाही मात्र त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याची अनुमती घेऊन आणि वरील आवाजाच्या मर्यादित ते लावणे बंधनकारक आहे, मात्र अजान देतांना त्याचे पालन होत नाही. तरी अनधिकृत भोंगे आणि त्यावरून होणारे ध्वनीप्रदूषण यासंदर्भात कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी लावलेल्या भोंग्यावर धडक कारवाई करावी अशी मागणी आ. निलेश राणे यांनी कुडाळच्या पोलीस निरिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!