सावंतवाडी : मला सहा महिन्यापूर्वीच लोकसभेची ऑफर होती. मात्र मी ती स्विकारली नाही. त्यामुळे जे राज्याच्या राजकारणात सक्रिय नाही त्यांना राज्यात काय घडेल हे कसे समजणार , असा टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांना लगावला.
तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी कोणालाही मिळो आम्ही त्यांना निवडून आणणार आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही.सद्या निवडूक असल्याने छोटे छोटे लोक बोलतच राहणार मात्र मी राज्याचा नेता असल्याने अशाच्या बोलण्यावर उत्तर देणार नाही असेही मंत्री केसरकर म्हणाले. ते सावंतवाडीत आले असतांना पत्रकारांनी विचारलेला प्रश्नावर ते बोलत होते.