3.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

हळवल येथील नव्या इमारतीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय

कणकवली : कणकवली, वैभववाडी, देवगड सार्वजनिक बांधकामाचा कारभार आता हळवल येथील नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या अथक प्रयत्नांतून प्रदीर्घ वर्षानंतर सुसज्ज असे सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालय हळवल येथे उभारण्यात आले आहे. या कार्यालयातून आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामकाज चालत असून, विकासकामांना गती देण्यासाठी मदत होणार आहे.

राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विविध विकासकामे मार्गी लागत आहेत. कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी पुढाकार घेऊन सुसज्ज असे बांधकाम विभागाचे कार्यालय उभारले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना विविध खोल्यांमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातून तीन तालुक्यांचा कारभार चालत आहे. अत्यंत महत्त्वाचे खाते म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाहिले जाते. विकास प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा वाटा आहे. काही महत्त्वपूर्ण विकासाची संकल्पना पूर्णत्वास नेण्यामध्ये कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. कणकवली विभागातील कणकवली रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाची सुसज्ज झालेली विश्रामगृहे, दर्जेदार रस्ते यासह विविध विकासकामे मार्गी लावण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला यश आले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण होताना दिसत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!