मुंबई : “राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांच्या जागी दुसऱ्या कोणाला आणलं जातंय का?” असा प्रश्न शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. राऊत म्हणाले, “केवळ एका गृहमंत्रीपदावरून महायुतीचा सरकार स्थापनेचा मुद्दा अडलेला असू शकत नाहीत. काहीतरी वेगळं कारण दिसतंय. इतकं मोठं बहुमत मिळाल्यावर गृहमंत्रीपद हा वादाचा विषय असू शकत नाही”. दरम्यान, “उद्यापर्यंत याचा उलगडा झाला नाही तर आम्ही आमचं पुस्तक उघडू”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी महायुतीला इशारा दिला आहे. “बहुमत असूनही राज्याला सरकार दिलं जात नाही ही शरमेची बाब आहे”, असं म्हणत राऊत यांनी महायुतीवर टीका केली आहे.