सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
सावंतवाडी : खोकल्याचे औषध समजून पाच वर्षाच्या चिमुकल्यांना शिक्षिकेने चक्क सॅनिटायझर पाजल्याचा प्रकार इन्सुलीतील एका अंगणवाडीत घडला आहे . ती दोन्ही मुले अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. तत्पूर्वी त्यांना परिसरातील बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु तिथून त्यांना सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालय नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्या दोघांना गेले काही दिवस सर्दी खोकल्याचा त्रास होता. त्यामुळे तेथे असलेल्या खोकल्याचे औषध समजून सॅनिटायझर पाजले. काही वेळाने ती मुले अस्वस्थ झाली. त्यामुळे त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर पालकांना सोबत घेऊन त्यांनी त्या दोन्ही मुलांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले .परंतु त्या ठिकाणी उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला देण्यात आल.
त्यानुसार त्यांच्यावर सावंतवाडीत उपचार सुरू आहेत. याबाबत बांदा येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पालकांकडून देण्यात आली. झालेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच त्याची नोंद प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.