आमदार नितेश राणे यांच्याहस्ते होणार उद्घाटन
कणकवली | मयुर ठाकूर : दरवर्षी प्रमाणे यावर्षी कणकवली शहरामध्ये समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित एक दिवस लहान मुलांचा “खाऊ गल्ली” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. खाऊ गल्ली या कार्यक्रमाचे आयोजन समीर नलावडे मित्रमंडळ यांच्या वतीने येणाऱ्या १ डिसेंबरला सायंकाळी ५:३० वाजता आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणपती साना येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लहान मुलांना मज्जा, मस्ती करण्यासाठी साजरा करत आहोत. त्यामध्ये पुणे आणि मुंबईचे मिक्स ऑर्केस्ट्रा तसेच दोन सिंगर यांचा समावेश आहे. त्यानंतर लहान मुलांना टॅटू काढले जाणार आहेत. यावेळी गोव्याचे दोन टॅटू काढणारे येणार आहेत. लहान मुलांना मज्जा, मस्ती करण्यासाठी मिकी माऊस, कार्टून येणार आहेत. त्याच्यानंतर आपण लहान मुलांना व त्यांच्या पालकांना फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉइंट एक तयार केला आहे. येणाऱ्या प्रत्येक मुलाला जवळजवळ १००० मुलांना दरवर्षी आपल्याकडे एक हजार पेक्षा जास्त मुलं सहभागी होतात. यामध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या एक हजार मुलांना मित्रमंडळातर्फे छोटीशी भेट वस्तू देण्यात येणार आहे.
यावेळी लावण्यात येणाऱ्या स्टॉलवर भेळ, पाणीपुरी तसेच पारंपारिक पदार्थांची चव चाखता येणार आहे. त्याचप्रमाणे पिझ्झा, बर्गर, वडापाव, चिकन सारखे पदार्थ आणि लहान मुलांसाठी सगळ्यात आकर्षक झोपाळे, पाळणे इत्यादी खेळ खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
येणाऱ्या लहान मोठ्या मुलांसाठी व पालकांसाठी ऑर्केस्ट्रा देखील ठेवण्यात आलेला आहे. या निमित्ताने जास्तीत जास्त लहान मुलांनी दरवर्षी प्रमाणे मुलांनी याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन समीर नलवडे मित्रमंडळाचे संस्थापक माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, संदीप नलावडे, बंडू गांगण, राजू गवाणकर, संदीप राणे,गौरव हर्णे, राजा पाटकर, नवू झेमणे, सुशील पारकर उपस्थित होते.