17.9 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

सावंतवाडीत दीपक केसरकरांचा विजय | राजन तेलींचा पराभव

अपक्ष उमेदवार विशाल परबांकडून कडवी झुंज…

सावंतवाडी : अपेक्षेप्रमाणे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तब्बल ३९ हजार ७२७ मतांची आघाडी घेत आपल्या सावंतवाडी मतदारसंघावर तब्बल ३९ हजार ७२७ चौथ्यांदा आपले नाव कोरले. तर ठाकरे शिवसेनेचे राजन तेली यांना पराभव पत्करावा. अपक्ष म्हणून रिंगणात असलेले भाजपचे बंडखोर विशाल परब यांनी कडवी झुंज दिली तर दुसऱ्या अपक्ष अर्चना घारे यांना मात्र समाधान मानावे लागले. सावंतवाडी मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया ही चुरशीची पाहायला मिळाली. तब्बल चार बलाढ्य उमेदवार या ठिकाणी उभे असल्यामुळे नेमका कोण विजयी होतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या विजयाचा चौकार मारला. या ठिकाणी शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना अशी लढत होण्याची शक्यता होती परंतु दीपक केसरकर यांनी त्या ठिकाणी एकतर्फी विजय मिळवला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!