2.9 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

बँक खात्यात ट्रान्स्फर केलेले सब्बा कोटी कोठून आले?

कणकवली : मविआचे उमेदवार संदेश पारकर यांनी त्यांच्या एका बँकेच्या खात्यात जमा झालेले १ कोटी ३० लाख रुपये दुसऱ्या लोन असलेल्या बँकेत ट्रान्स्फर केलेत. ते कुठून आले, कोणी व का दिले? आमदार नीतेश राणेंनी ही मदत नाही केली, तर कोणी केली हे त्यांनी सांगायला हवे. एका कन्स्ट्रक्शन कंपनीकडून व त्याच्या मालकाकडून त्यांना दोनवेळा पस्तीस लाख रु. खात्यात जमा झाले. त्यांच्या पत्नीकडूनही बीस लाख रु. त्यांच्या खाती ट्रान्सफर झालेत. या साऱ्याबाबत पारकरांनी १५ नोव्हेंबरपर्यंत खुलासा करावा, अन्यथा याचा पर्दाफाश आपण १५ नंतर करू, असा इशारा अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानींनी दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना खानी म्हणाले, पारकरांनी त्यांच्याकडे हे पैसे कुठून आले हे प्रामाणिकपणे शिवसैनिक व पत्रकारांकडेही स्पष्ट करायला हवे, तेही पुराव्यासह, माझ्याकडील पुराव्यानुसार या १ कोटी तीस लाखांनंतर एका कन्स्ट्रक्शन कंपनीकडून त्यांना एकदा दहा लाख, नंतर त्याच कन्स्ट्रक्शनच्या मालकांकडून २५ लाख व पारकरांच्या पत्नीच्या खात्यावरून वीस लाख ट्रान्सफर झाल्याचे दिसत आहे. ही रक्कम त्यांना का व कशासाठी ते समजू शकलेले नाही. त्याबाबतही पारकर यांनी खुलासा करायला हवा, या संदर्भात अनेक शंका निर्माण होत असून आमदार राणे व पारकर यांची मिलीभगत असण्याची शक्यता आम्ही व्यक्त केली होती. त्याला या साऱ्यातून दुजोरा मिळत असल्याचे खानी यांनी सांगितले.

राणे व पारकर हे एकच असून पारकरांना मत म्हणजेच राणेंना मत आहे. हे दोघे मिळून लोकांना फसविण्याचे काम करताहेत, हा आम्ही केलेला आरोप देवगड येथील रापण महोत्सवानिमित्ताने सिद्ध होत आहे. तेथे हे दोघे एकत्र आले होते. त्यामुळे आता लोकांना उल्लू समजू नये. हे गंभीर असून ही आमच्या हवकाची लढाई आहे. एकीकडे पारकर सांगत होते, की नवाज खानी यांना राणेंनी उभे केले आहे. पण पारकर यांचे हे आरोप आता खोटे ठरत असल्याचे दिसत आहे. आमदार राणे म्हणतात, की ही लढाई मैत्रीपूर्ण लढाई आहे. पारकर आपले दोस्त आहेत, ते आपल्याला मदत करत आहेत. या साऱ्याचा विचार केला, तर पारकर यांनी ते एक कोटी तीस लाख रु. राणेंनी आपल्याला दिलेले नाहीत हे पुराव्यासह सांगायला हवे. त्यांनी १५ तारीखपर्यंत स्पष्ट न केल्यास १६ तारीखला आपण पुराव्यासह स्पष्ट करू, असे खानी म्हणाले. आजचे स्टेटमेंट हा ट्रेलर असून पिक्चर अभी बाकी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!