10 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

मी कोकणी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही ; अर्चना घारे परब

मतदार संघातमहिला उभी राहिल्याने विरोधकांना धडकी भरली..

वेंगुर्ले : महिला उमेदवार उभी राहिल्याने विरोधी उमेदवारांना धडकी भरली आहे. मी कोकणी मुलगी आहे, मोडेन पण वाकणार नाही. तुमच्या मागण्या सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहे. मला तुमचं एक मत देऊन मतदारसंघ योग्य हातात द्या असे आवाहन अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी केळुस कालवेबंदर येथील ग्रामस्थांना केले.

अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी घरोघरी जावून प्रचार करण्यास पसंती दिली आहे. आज केळुस कालवेबंदर येथे खळा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यादरम्यान स्थानिक ग्रामस्थानी अनेक प्रश्न अर्चना ताईसमोर मांडले.

यावेळी अर्चना घारे परब यांच्या समवेत श्री. योगेश कुबल , दीपिका राणे , विक्रांत कांबळी , विशाल बागायतकर , अवधूत मराठे , विठोबा टेमकर , सुहास मोचेमाडकर , आदिती चुडजी , कुणाल बिडीये , वनिता मांजरेकर , रिया धुरी, शुभम नाईक , सुनिता भाईप , प्रशांत बागायतकर, विवेक गवस आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब म्हणाल्या, मच्छीमार हा समुद्राचा राजा आहे. तुमच्या लढ्यात मी सहभागी आहे असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.

पुढे त्या म्हणाल्या, मागील सात-आठ वर्षे मी काम करते. वाड्यावस्त्यांवरील प्रश्न मी ऐकते आहे. मागील काही दिवसात एका वेगळ्याच प्रकारचे राजकारण झाल्याने मला माझ्या हक्काचे तिकीट मिळाले नाही मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल केला. तुम्ही माझ्या पाठीशी उभे रहा मी तुमच्यासाठी उभी राहीन असं ठाम विश्वास त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला.

यावेळी ग्रामस्थांनी तुम्ही निवडून आल्या नंतर दुसऱ्या पक्षात गेल्यास आम्ही काय करायचे असा प्रश्न विचारला त्यावेळी अर्चनाताई म्हणाल्या, गेली सात आठ वर्षे मी प्रामाणिकपणे पवार साहेबांसोबत आहे. मी पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ता आहे. माझ्या कामाचा आलेख पाहिला असता त्यावर कुठचाही डाग नाहीये. राजकारणात महिलांचा वापर करण्यात येत आहे उमेदवार विकासाबद्दल न बोलता एकमेकांवर टीका करत आहेत या मतदार संघात महिला उभी राहिल्याने विरोधकांना धडकी भरली आहे. आणि चांगले काम करण्यासाठी पुढे चाललो आहोत आमच्या बाजूने भक्कमपणे उभे राहा एकजुटीने बदल करूया असे आवाहन ताईंनी ग्रामस्थांना केले.

कोकणी माणूस हा मनाने श्रीमंत आहे मात्र आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. हीच संधी आहे मला फक्त तुमचा एक मत द्या उर्वरित आयुष्य मी लोक सेवेसाठी देईन असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!