3.6 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

कलमठ अपक्ष ग्रामपंचायत सदस्या नजराणा शेख यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश

कणकवली : कणकवली तालुक्यातील कलमठ येथे आमदार नितेश राणे यांचा गाव भेट कार्यक्रम संपन्न झाला, यादरम्यान कलमठ ग्रामपंचायतच्या अपक्ष ग्रामपंचायत सदस्या नजराणा शकील शेख यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला.

यापूर्वी नजराणा शेख या दोन वर्षे अपक्ष सदस्य म्हणून काम करत होते. मात्र अपक्ष राहून एकही विकासकामे गावात होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन भाजपामध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कलमठ गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाले आहेत. गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.

यावेळी गावचे खोत सुनील नाडकर्णी, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, माजी पं. सदस्य महेश लाड, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, आशिये सरपंच महेश गुरव, खरेदी विक्री संघ अध्यक्ष प्रकाश सावंत, सोनू सावंत, शक्ती केंद्रप्रमुख विजय चिंदरकर, प्रिया टेमकर, सरिता राऊत, कलमठ ग्रामपंचायत सदस्य पपू यादव, नितीन पवार, श्रेयश चिंदरकर, सुप्रिया मेस्त्री, प्रीती मेस्त्री, स्वाती नारकर, तेजस लोकरे, स्वरूप कोरगावकर, परेश कांबळी, बबन गुरव, अमजद शेख, मिलिंद चिंदरकर, बाबू नारकर, ज्ञानदेव गुरव, गुरू वरदेकर, आबा कोरगावकर, अभिजीत गुरव महेश मेस्त्री, सुरेश वर्देकर, जयराम चिंदरकर, गणेश पुजारे, यश वाळके, कौस्तुभ पुजारे , रुपेश गायचोर, अशोक खाजन वाडकर, अनिल मेस्त्री, सागर पवार, राजू नारकर, शरद कुडतरकर, अमित लोके, भूषण खाजनवाडकर, भारती गुरव, अपर्णा बोस, शेखर पेंडुरकर, गौरी साळकर, गोविंद साळकर, विराज मेस्त्री, योगेश जाधव, सचिन वाघेश्री, ईशान फाटक, श्रीकृष्ण आचरेकर, रोशन जाधव, सौरभ रावले आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!