8.2 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

मुलाचे बालहट्ट पुरवण्यासाठी खा. राणेंना घ्याव्या लागत आहेत खळा बैठका

२३ नोव्हेंबर ला निलेश राणेंचा पराभव निश्चित ; सोबतच्या कार्यकर्त्यांनी २०१४ ची निवडणूक आठवावी

माजी आ. परशुराम उपरकर यांनी राणेंना फटकारले

कणकवली : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री खा नारायण राणे भाजपच्या स्टार प्रचारकर यादीत असताना आपल्या मुलाचे बालहट्ट पुरवण्यासाठी खळा बैठक घेत आहेत. नारायण राणेंनी ११९० -९५ ची निवडणूक आठवावी. राणे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होते. त्यावेळचे शिवसैनिक नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी काम करत होते. तेव्हा राणे फक्त दोन ते चार दिवस मतदार संघात यायचे, आणि आता त्याच नारायण राणेंना स्वतःच्या मुलासाठी खळा बैठक, छोट्या बैठका घ्याव्या लागतात. हीच खरी नारायण राणेंची अधोगती आहे, असा उपरोधी टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे. यावेळी ते कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, नारायण राणे शिवसेनेत तसे काँग्रेसमध्ये स्टार प्रचारक झाले. तेव्हा तिथे काँग्रेसची सत्ता गेली आहे. दीपक केसरकर यांनी एकदा असे म्हटले की, राणे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षात जातात त्या त्या ठिकाणची सत्ता जाते. तसेच यावेळी देखील होणार असल्याची टीका श्री. उपरकर यांनी केली.

राणे ज्या ठिकणी गेलेत किंवा मुलगा जिथे गेलाय तिथे सत्ता जाणार आहे. आजच्या घडीला राणे हतबल झालेले आहेत.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा १३ तारीख ला होणार असल्याचे पत्रकारांनी विचारले असता, माजी सभा साडेतेराला होणार हे.! हे कशाच्या आधारे सांगितलं आहे…साडेतेराला म्हणून ? असा सवाल उपस्थित केला. तसंच राणेंना अशा प्रकारचे वक्तव्य का करावे लागले, तर राणे हे हतबल झालेले आहेत.

जुने शिवसैनिकच राणेंना धडा शिकवतील

उद्धव ठाकरे १३ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर सभेसाठी येणार आहेत. यावेळी राणेंनी त्यांना इकडे येऊन रस्त्यावरून जाऊन दाखवा, असा इशारा दिला. यावर तोडीस तोड उत्तर देत माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले, रस्ता हा राणेंच्या बापाचा नाही. हा सर्वसामान्य नागरिकांचा रस्ता आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडवून दाखवा त्यांच्यासोबत असलेले व तुमच्या वेळी असलेले जुने शिवसैनिक आता बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे अशा सुक्या धमक्यांना कोण घाबरत नाही. शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी त्याच स्टाईलने उत्तर देतील, हे राणेंनी लक्षात ठेवावे, असा इशारा देखील श्री. उपरकर यांनी दिला आहे.

राणेंचे सर्वच बाबतीत पोलखोल झाले आहेत. एकीकडे राहणे सांगत आहेत की, आपण २०० कोटींच ट्रेनिंग सेंटर आणल आहे. मात्र तिथे फक्त बोर्ड लावलेला आहे. त्या पलीकडे तिथे काहीही बदल झालेले नाहीत. १९९९ मध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री असताना विमानतळाला दगड लावला, त्यानंतर विविध पद भूषवली. मात्र ते जैसे थेच राहिले. राणेंच्या ट्रेनिंग सेंटरला किंवा राणेंच्या फसव्या योजना लोकांना कळून चुकल्या आहेत आणि राणेंना देखील कळून चुकले आहे की, आपल्या मुलाचा पराभव होणार आहे. राणे आमदार असल्यापासून मुख्यमंत्री असेपर्यंत शिवसेनेत होते. तेव्हा राणेंवर शिवसैनिकांनी अशी परिस्थिती आणू दिली नव्हती. मात्र आता भाजप आणि शिंदे सेनेने राणेंना अशा प्रकारची परिस्थिती आणून दिलेली आहे.

दापोली ची सभा आणि चिपळूणच्या सावंतांना मारहाण झाल्यानंतर निलेश राणेंची जी बोलण्याची पद्धत आहे. त्यावर निलेश राणे यांनी आवर घातलेला असला तरी, येणाऱ्या २३ नोव्हेंबर ला निलेश राणे पडल्यानंतर सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना देखील झोडतील आणि सोबतच्या कार्यकर्त्यांना हवं ते बोलतील. निलेश राणे शांत झाले तरी लोक त्यांना निवडून देणार नाही. लोकांना राणेंची दहशत आणि राणेंच्या दोन्ही मुलांची दहशत लोकांच्या स्मरणात आहे. दापोलीच्या सभेत महिलांबद्दल जे काय बोललात किंवा एखाद्याला कशा पद्धतीने शिव्या घालता हे सर्वांनी बघितलेलं आहे. त्यामुळे निलेश राणे या २० दिवसासाठी जरी गप्प राहिले तरी ते नंतर गप्प राहणार नाही ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागणार आहेत. हे लोकांनी लक्षात ठेवावे. निलेश राणेंच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी २०१४ ची निवडणूक लक्षात ठेवावी. त्या निवडणुकीनंतर कोणाची बोटं तुटली, लोक संध्याकाळी सात नंतर फिरत नव्हते. तोच प्रकार आता होणार आहे. कार्यकर्त्यांसह लोकांना देखील मोठ्या प्रमाणात सध्या पैशांचे वाटप करत आहेत. कार्यकर्त्यांना पैसे मिळाल्यानंतर मतदान कमी झाले की कार्यकर्त्यांना २०१४ ची निवडणूक आठवावी लागेल, म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र आखडता हात घेतलेला आहे. ते काम आपल्या पक्षा पुरते करत आहेत. मात्र भारतीय जनता पक्ष पैसे वाटण्याच्या बाबतीत पडत नाही आहे. खासदार नारायण राणे हे भाजपमध्ये आहेत आणि त्यांचा मुलगा निलेश राणे हे शिंदे शिवसेनेत आहेत. सध्या होत असलेले प्रवेश पाहता शिंदे शिवसेनेत मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. त्यामुळे राणे भाजपकडे दुर्लक्ष करून शिंदे शिवसेनेचे प्रवेश वाढवून शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी वाढवत आहेत. हे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं, असे देखील श्री. उपरकर म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!