18.4 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

हरकुळ मधील मुस्लिम महिलांचा भाजपात प्रवेश हा सहानुभूतीसाठीच

हरकुळ मधील मुस्लिम समाजाच्या महिला या कायमस्वरूपी उद्धव ठाकरे, आणि संदेश पारकर यांच्या पाठीशी

विद्यमान आमदार मुस्लिम समाजावर करत असलेले वक्तव्य आम्हाला समजतंय

जैबा कुरेशी महिला उपतालुक हरकुळ कणकवली यांनी घेतला समाचार

कणकवली | मयुर ठाकूर : आज कणकवली येथे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हरकुळ बुद्रुक येथील मुस्लिम समाजाच्या असंख्य महिला कार्यकर्त्यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला, अस दाखविण्यात आले. यावर हरकुळ येथील फैयाज खान यांनी त्या महिला कार्यकर्त्यांचा दाखवलेला प्रवेश हा बोगस असून जनतेची दिशाभूल करण्यासाठी दाखवलेला खोटा प्रवेश असल्याची टीका केली.

तर महिला उपतालुकाप्रमुख कणकवली हरकुळ बुद्रुक जैबा कुरेशी यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत असे म्हटले आहे की, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या महिला या आमच्या पदाधिकारी किंवा आमच्या पक्षातील नसून त्या भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरातील असल्याचे सांगितले. आमच्या येथील महिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असून आम्ही कायम पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच आताचे कणकवली विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर यांच्या सोबत कायम आहोत आणि कायम राहणार, असा विश्वास जैबा कुरेशी यांनी व्यक्त केला.

आता वाढत असलेली महागाई ही सर्व सामान्य लोकांना परवडत नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या सर्व महिला या आजपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत होत्या. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही कणकवली विधानसभा मतदारसंघात संदेश पारकर यांच्या बाजूने राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या. आताचे आमदार जे काय मुस्लिम समाजाच्या बाबतीत वक्तव्य करत आहेत ते आम्हा मुस्लिम महिलांना सगळं समजत आहे. त्यामुळे आम्हाला भाजपा पक्षात जायचे पण नाही, आणि त्यांना साथ ही द्यायची पण नाही. आताच्या आमदारांना निवडणुकीसाठी सहानुभूती पाहिजे आहे. आम्हाला प्रवेश करण्यासाठी बोलावले जात आहे. मात्र आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी व शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. अशा शब्दात विद्यमान आमदारांवर जैबा कुरेशी यांनी टीका केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!