कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातील दाखल उमेदवारी अर्जाची छाननी झाली. त्यामधून जवळजवळ ८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. पुढची प्रक्रिया ४ तारीखला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आहे. जे अधिकृत उमेदवार शिल्लक राहतील, त्यांच्यात लढत होईल. मुस्लिम बांधवांमधून एक उमेदवार उभा केलेला आहे. नितेश राणे यांनी मतांची विभागणी व्हावी म्हणून मुस्लिम बांधवांचा उमेदवार देण्यात आला आहे. तसेच माझ्या नावाला साम्य असणारे संदेश परकर त्यांचा सुद्धा उमेदवारी अर्ज वैध झालेला आहे. संदेश पारकर यांच्या नावाची भीती किती नितेश राणेंनी घेतलेली आहे, असा टोला ठाकरे-शिवसेनेचे संदेश पारकर यांनी लगावला.
नितेश राणेंचे भवितव्य त्यांना कळून चुकलेले आहे. संदेश पारकर यांना मिळालेला जनाधार त्यामुळे ते निवडून येणार म्हणून त्यांना पडणारी मतांची विभागणी व्हावी किंवा दुसरीकडे मतदान व्हावं, यासाठी त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे. पण जनता सुज्ञ आहे, येथे २० तारीखला मतदान होईल. २३ तारीखला या निकालावर महाविकास आघाडीचा भगवा फडकलेला आपल्याला दिसेल, असेही संदेश पारकर म्हणाले. या वेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, तात्या निकम, आदित्य सापळे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.