कणकवली कार्यकारी अभियंता महावितरण कंपनीला दिले लेखी निवेदन
कणकवली : नांदगाव दशक्रोशीतील वीज समस्या दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. सतत कणकवली हून येणाऱ्या ३३ kv लाईन फॉल्टी होऊन वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे तोही जवळपास सायंकाळी खंडित झालेला वीज पुरवठा केव्हा केव्हा दुसऱ्या दिवशीही सुरू होतो.नेहमीच्या या समस्येमुळे व्यापारी वर्ग पुरता मेटाकुटीला आलेला आहे.असे वारंवार होत असल्याने आपली लाईट बिले तरी का भरावीत ? असा प्रश्न आम्हा सर्व वीज ग्राहकांना पडलेला आहे. म्हणूनच आम्ही या महिन्यापासूनच येणाऱ्या सर्व वीजबिलांवर सामुदायिक रित्या बहिष्कार घालत आहोत जोपर्यंत आपण सतत होणाऱ्या ३३ kv विद्युत लाईन दुरुस्ती करुन सुरळीतपणे विज पुरवठा देत नाही तोपर्यंत एकही विज ग्राहक आपले विज बिल भरणार नाही.तसेच ग्रामपंचायत च्या नळ पाणी योजनेवरही परिणाम झाल्याने नळ पाणी योजनेचे ही वीज बिल भरणार नाही असा इशारा नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी दिला आहे. तसेच सर्व विज ग्राहक यांनी एक मुखी निर्णय घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच कोणाचेही विद्युत पुरवठा विज बिल अभावी जर तिनं महिने कालावधीतील बिल असेल तर खंडित करु नये अशी भूमिका घेतली आहे.
याबाबत कार्यकारी अभियंता श्री माळी यांनी असलदे सब स्टेशन ते तळेबाजार पर्यायी लाईन त्वरित कशी करता येईल याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येतील अशी ग्वाही दिली. असून. नांदगाव येथील सर्व कर्मचारी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले आहे.
नांदगाव विद्युत अभियंते तसेच लाईनमन यांनी मुख्यालय राहणे गरजेचे असून ते राहत नसल्याने आक्रमक बनले होते.
यावेळी कार्यकारी अभियंता माळी , बगडे यांच्याशी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर,असलदे माजी सरपंच तथा भाजपचे तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर,विज ग्राहक संघटना कणकवली च श्री कुलकर्णी, नांदगाव माजी सरपंच शशी तोरसकर ,सोसायटी माजी चेअरमन रवींद्र तेली , व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिकेत तर्फे,प्रदीप हरमळकर, कमलेश पाटील, रघुनाथ लोके , प्रतिक भाट, रामचंद्र मोरये, विजय आचरेकर, आयनल माजी सरपंच बापू फाटक, संतोष वायंगणकर, राजू तांबे, योगेश सदडेकर, श्रीकृष्ण वायंगणकर आदी विज ग्राहक यांनी चर्चा केली आहे.