7.7 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

असलदे येथील उबाठा कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

कणकवली | मयुर ठाकूर : तालुक्यात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. असलदे येथील उबाठा सेनेचे रामचंद्र परब,विनेश परब,सुदिन तांबे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले.

यावेळी आमदार नितेश राणे यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पक्षात योग्य तो मान सन्मान दिला जाईल, आश्वासित केले.

यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, सरपंच चंद्रकांत डामरे , उपसरपंच सचिन परब, माजी सरपंच पंढरी वायगणकर, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम हर्षदा वाळके, प्रकाश पारकर,माजी सरपंच सुरेश लोके प्रकाश परब रघुनाथ लोके परशुराम परब आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!