कणकवली | मयूर ठाकूर : येथील सेवानिवृत्त शिक्षक सीताराम गणपत परब (८८) यांचे १५ ऑक्टोबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. परब गुरुजी म्हणून ते सुपरिचीत होते. सर्व सामाजिक, शैक्षणिक, वाडीतील कौटुंबिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. गावच्या विकासकामातही अग्रेसर असायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कणकवलीतील प्रशंसा ब्युटीपार्लरच्या प्रोप्रायटर सुवर्णा मोडक यांचे ते वडील, जानवली येथील डॉ. मृणाली परब, कळसुलीचे डॉ. संतोष मोडक यांचे ते सासरे होत.