8.2 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रभावीपणे काम करणार – नामदेव जाधव

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चा ची संघटनात्मक बांधणी केली जात आहे. समाजाच्या हिताच्या दृष्टिने भाजपा काम करत असताना आपल्या समाजाने पक्षाच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आमच्या सेलची संघटनात्मक करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात नितेश राणेंच्या रुपाने अनुसुचित जातीच्या पाठीशी राहणारे खंबीर नेते आहेत. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हात प्रभावीपणे काम करणार असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांनी व्यक्त केला.

ओरस येथे भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चा जिल्हा कार्यकारणी बैठक “वसंत स्मृती” येथे पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महेश चव्हाण, किरण जाधव, पुंडलिक कदम, राजेश सुरेश चव्हाण, विद्याधर कदम, संतोष जाधव, चंद्रकांत वालावलकर, अनंत आसोलकर, देवदत्त कदम, बाळू जाधव, अशोक कांबळे, राजेंद्र चव्हाण, गौतमी कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या बैठकीमध्ये कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वातून दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी कणकवली येथे “आरक्षण बचाव रॅली” काढण्यात आली होती. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका भाषणामध्ये बोलले होते. की जर भारतामध्ये काँग्रेसची सत्ता आली तर आम्ही आरक्षण रद्द करू असे विधान केले होते. त्यासंदर्भात कणकवली विधानसभेमध्ये आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली. त्यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले आरक्षण रद्द केले तर मी बहुजनांचा पाठीराखा म्हणून खंबीरपणे उभा राहील असा विश्वास नामदेव जाधव यांनी व्यक्त केला. त्यासंदर्भात या बैठकीमध्ये आमदार नितेश राणे यांचा अभिनंदनचा ठराव घेण्यात आला. तसेच कणकवली विधानसभा संयोजक म्हणून संतोष जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!