दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाचे आयोजन
वैभववाडी प्रतिनिधी : दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ वैभववाडी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबरात ४१ जणांनी रक्तदान केले. दुर्गोत्सव २०२४ चे औचित्य साधत, प्रतिवर्षाप्रमाणे मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री शांताराम रावराणे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या प्रसंग विद्यमान अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे यांनी आपले तीसावे रक्तदान करून रक्तदांन नियमावली नुसार वयiच्या पासष्ट वर्षा पर्यंत अविरतपणे स्वरक्तदानाचे कार्य चालू ठेवणार असल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले.
त्यांच्या अखंडित रक्तदान कार्याची दखल घेवून जीवन धiरा ब्लड बँक, कोल्हापूर आणि दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. या शिबिरामध्ये तब्बल ४१ जणांनी रक्तदान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या सर्व रक्त दात्यांचे मंडळाकडून सन्मान पत्र तसेच सन्मान चिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ज्यां युवकांनी या शिबिरात आपले पहिले रक्त दान करून प्रारंभ केला त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी श्री.सज्जन काका, सुधाकर काका, संजय सावंत, गंगाधर केळकर, मनोज सावंत, ऋषी घाडी, हरूण हवालदार, बापु खांबल, गणेश मसुरकर, इम्तियाज बिजापूरी ,तेजस आंबेकर, नितीन महाडिक, बबलू रावराणे, अंकित सावंत, आबु पारकर, प्रथमेश रावराणे, प्रशांत ढवण, विजय लोके, संतोष महाडीक, विनय राणे, सुधीर राणे, नवनाथ तोरस्कर, संदीप मोरे, संतोष कोलते, रोहन रावराणे, रवि तांबे, ऋषिकेश पांचाळ, संतोष कुडाळकर, संतोष कोलते, पप्या रावराणे तसेच जीवनधारा ब्लडबँक कोल्हापूरचे नयनिश मोरे, सुनील कांबळे, रमजान नगारची, शादाब पटेल व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गा माता मंडळ सचिव श्री संजय रावराणे यांनी केले.