मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिंदे सेनेत प्रवेश
मालवण : काही महिने ठाकरे शिवसेनेपासून अलिप्त असलेले मालवणचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मुंबई ठाणे येथील संकल्प नवरात्रौत्सव मंडळाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मालवण शहरातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपण ठाकरे शिवसेनेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे श्री. कांदळगावकर यांनी म्हटले आहे.
सुमारे अडीज वर्षापूर्वी मालवणच्या नगरध्यक्ष पदाची मुदत संपल्यानंतर मालवणचे तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष महेश कांदळगावकर हे गेले वर्षभर ठाकरे शिवसेनेपासून काहीसे अलिप्त होते. ठाकरे शिवसेनेतील नाराजीमुळे संघटनेपासून अलिप्त महेश कांदळगावकर अलिप्त होते. दरम्यानच्या कालावधीत मालवण शहरातील विकास कामांबाबत सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचीही कांदळगावकर यांनी भेट घेतली होती. या भेटीमुळे श्री. कांदळगावकर हे भाजपात जातील अशी चर्चा होती. मात्र महेश कांदळगावकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज मुंबई ठाणे येथील शिंदे शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्पनेतून साजऱ्या होत असलेल्या संकल्प नवरात्रौत्सव मंडळाच्या कार्यक्रमात महेश कांदळगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रभारी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सिंधुदुर्ग निरीक्षक दीपक वेतकर, सिंधुदुर्ग युवासेना जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, किसन मांजरेकर, नम्रता फाटक , सौ. स्मृती कांदळगांवकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.