कणकवली | मयुर ठाकूर : विजयदुर्ग – तरेळे रस्त्याच्या भूमिपूजन सोहळा प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड म्हणाले, विजयदुर्ग – तळेरे रस्त्यासाठी ४१७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हा रस्ता ५२ किलोमीटर अंतराचा असणार आहे. सध्या या रस्त्याची रुंदी साडेपाच मीटर आहे. मात्र नवीन रस्त्याची रुंदी ही सात मीटर असणार आहे. हा रस्ता किमान ३० वर्षे टिकेल असा दर्जेदार रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. या रस्त्याचा उपयोग विजयदुर्ग – तळेरेकडे जाणाऱ्या पर्यटकांना होणार आहे. यामुळे काजू – आंबा उत्पादक यांच्या रोजगाराला चालना मिळेल. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी या रस्त्याचा मोलाचा वाटा ठरेल, असे मत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी व्यक्त केले.