कणकवली : उपजिल्हा रुग्णालय कणकवली च्या वतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन कलमठ उपकेंद्र येथे घेण्यात आले होते. या शिबिरात ८० ते ११५ लाभार्थींनी लाभ घेतला सदर शिबिराचे उद्घाटन सरपंच संदीप मिस्त्री यांच्या हस्ते झाले यावेळी विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात येऊन आवश्यकतेनुसार मोफत औषध उपचार करण्यात आले सदर शिबिरामध्ये डॉक्टर माधव उबाळे, प्रतीक कदम ,कैलास मुंडे या डॉक्टरांनी उपस्थित राहून तपासणी केली यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, तालुका सरचिटणीस समीर प्रभूगावकर, आरोग्य सेवक चंद्रमणी कदम, आरोग्य सेविका सावंत, उषा लाड भावना चिंदरकर, भाग्यश्री बांदिवडेकर, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.