8.2 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

कथित आर्मी मॅनचा फोंडा येथील हॉटेल व्यावसायिकाला २८,०००चा ऑनलाईन गंडा

फोंड्यातील काही नागरिकांनाही फोन ; सतर्क राहणं गरजेचे 

कणकवली : अलिकडेच मोठ्याप्रमाणावर ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्याप्रमाणावर घडत आहेत. अशीच एक घटना तालुक्यातील फोंडा येथे घडली आहे. कथित आर्मी मॅनने फोंडा येथील हॉटेल व्यावसायिकाला २८,०००चा ऑनलाईन गंडा घातल्याच प्रकार उघड झाला आहे.
एका सामान्य हॉटेल व्यावसायिकाला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. त्या कॉलवर आपण आर्मीमधून बोलत असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे रिस्पेक्ट देत त्या हॉटेल व्यावसायिकाने त्या कॉलवर संभाषण केले. त्यावेळी सदर कॉलवर बोलणाऱ्या त्या कथित आर्मीच्या माणसाने आपण फोंडा ते दाजीपूर या परिसरात कॅम्प ला आलो असल्याचे सांगितले. यावेळी आपल्या समवेत १० ते १२ जण असल्याचे देखिल सांगितले. यावेळी आपल्याला ६० प्लेट पावभाजी हवी असल्याचे सांगितले. त्यावेळी त्या हॉटेल व्यावसायिकाने ठिक आहे. आपण सकाळी ९ वाजेपर्यंत नाष्टा पॅक करून देतो असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा त्या हॉटेल व्यावसायिकाला फोन आला. यावेळी आपण १०-१२ दिवसांचे पैसे आपणास पे करतो असे सांगण्यात आले. यावेळी समोरील कथित आर्मी मॅनने ऑनलाईन पेमेंट करतो तुमचा ऑनलाईन पेमेंट स्कॅनर पाठवा असे सांगितले. यावेळी समोरील कथित आर्मी मॅनने आपण ऑफिसचा स्कॅनर पाठवतो त्यावर ‘हाय’ मेसेज करा आपले पेमेंट करतो असे सांगितले. त्यावरून २० रूपये त्या हॉटेल व्यावसायिकाच्या ऑनलाईन पेमेंटद्वारे खात्यावर जमा झाले. मात्र, दुर्दैवाने तो हॉटेल व्यावसायिक त्या कथित आर्मी मॅनच्या आणि संभाषणात बळी बनत चालला होता. क्षणार्धातच त्या हॉटेल व्यावसायिकाच्या खात्यावर असलेले ३०,००० रूपयांपैकी २८,००० हे त्या कथित आर्मी मॅनने ऑनलाईन फसवणुक करून खात्यावरून लांबविले. त्यावेळी आपली फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच, सदरची घटना आजूबाजूला पसरली. आणि त्या हॉटेल व्यावसायिकाने तातडीने कणकवली पोलिस स्टेशन गाठले. यावेळी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ‘सायबर क्राईम सेल’ च्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली.

मात्र, या घटनेबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की, सदर कथित आर्मी मॅनने अगदी पूर्ण माहिती काढूनच त्या हॉटेल व्यावसायिकाला फोन केला आणि आपण संपूर्णपणे ओळखत असल्याचे भासविले. असाच फोन फोंड्यातील काही व्यावसायिकांना आला असल्याची माहिती देखिल मिळाली. तसेच दुसऱ्या हॉटेल व्यावसायिकाला फोन आला ‘त्याला पुरीभाजी आणि वडे नाष्ट्यासाठी हवे असल्याची ऑर्डर दिली. मात्र, एकदा घडलेली घटना पाहता दुसरा हाटेल व्यावसायिक सतर्क झाला.

मात्र, फोंड्यामध्ये अनेक लोकांना या एकाच फोनवरून फोन येत असल्याची माहिती देखिल मिळाली त्यामुळे अशा अनोळखी फोनपासून सावधानता बाळगा आणि सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!