8.8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

असलदे डामरेवाडी येथील धोकादायक वळणावर जेसीबीने रुंदीकरण

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी घेतली दखल 

असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, सोसायटी चेअरमन भगवान लोके यांच्या मागणीला यश

कणकवली : देवगड निपाणी महामार्गावरील असलदे डामरेवाडी प्रवासी शेड येथील धोकादायक वळणावर छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले होते. काही महिन्यांपूर्वी खाजगी बस व कारमध्ये अपघात झाला होता. त्यामुळे हे धोकादायक वळण कमी करण्यात यावे , वाढलेली झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवावी अशी मागणी असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके व ग्रामस्थांनी केली होती. या मागणीची सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दखल घेतली. त्यानुसार देवगड बांधकामचे उपविभागाचे उपअभियंता श्री. बातुसकर यांनी जेसीबीच्या सहाय्याने त्या वळणावर रुंदीकरण करत झाडीची साफसफाई केली आहे.

असलदे डामरेवाडी येथे देवगड निपाणी या मार्गावर धोकादायक वळणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करत वळणावर रुंदीकरण व वाढलेल्या झाडीची साफसफाई केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे, चेअरमन भगवान लोके , उपसरपंच सचिन परब , माजी सरपंच पंढरी वायंगणकर , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , माजी चेअरमन प्रकाश परब , संचालक शत्रुघ्न डामरे , परशुराम परब , संतोष परब , उदय परब , विठ्ठल परब , अनिल लोके , रघुनाथ लोके , सुरेश मेस्त्री , संजय लोके , बाबाजी शिंदे , प्रदिप हरमलकर , प्रकाश आचरेकर , महेश लोके , मनोज लोके, सत्यवान लोके , गणेश तेली , दिनेश शिंदे , प्रकाश लोके . वासुदेव दळवी, तुषार घाडी ,बाबू वाळके , राजु राणे, प्रविण डगरे, सुरेश मेस्त्री , मनोहर खोत, विजय डामरे , बाबू जांभळे, विजय परब आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!