9.1 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

देवगड नांदगाव रस्त्यासाठी ३३१ तर विजयदुर्ग तरळा रस्त्यासाठी २८२ कोटींचा निधी

रस्ते होणार दर्जेदार ; देवगडचा चेहरा निश्चितपणे बदलणार, विकासाला मिळणार चालना, नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास

देवगड : मोंड वानिवडे पुलाच्या भूसंपादनाचा प्रश्न कांदळवन भूमीमुळे अत्यंत जटिल झाला होता. पर्यावरण व मंत्रालय पातळीवरील पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली असून न्यायालयीन पातळीवरील दुसऱ्या टप्प्यासाठी मंजुरी मिळवू असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

देवगड मधील विविध विकास कामांची माहिती देण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी जामसंडे येथील भाजपा पक्ष पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मोंड वानिवडे पुलाच्या भूसंपादनाविषयी झालेल्या मंजुरीबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम,ज्येष्ठ नेते बाळासाहेब खडपे,बाळा जठार, तालुकाध्यक्ष राजेंद्र शेटये, बंडू नारकर, संतोष किंजवडेकर,योगेश चादोसकर, दयानंद पाटील आदी उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांचा समाधान करण्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले आहेत. यापूर्वीच्या सर्व प्रतिनिधींनी देखील विकासासाठी एकत्र काम केले आहे. आता महायुती सरकार आणि पालकमंत्री यांच्यामुळे या समस्यांमध्ये प्रगती दिसून येत आहे. उदाहरणार्थ, मोंड- वानवडे पुलाच्या संदर्भात वर्षानुवर्षे चालू असलेल्या समस्येचे समाधान करण्यात मदत झाली आहे. स्थानिक लोकांनी याची अनेक वेळा आवाज उठवला आणि यासाठी विविध आंदोलने केली.१० वर्षांच्या कार्यकाळात संबंधित अधिकाऱ्यांशी सतत चर्चा केली आणि या समस्येला प्राधान्य दिले.

या पुलाच्या बांधकामात अडथळा होता, कारण तिथे कांदळवने असल्यामुळे नियम कडक होते. आता त्यांना पहिल्या टप्प्याची परवानगी मिळाली आहे आणि ते दुसऱ्या टप्प्याच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात प्रयत्न करत आहेत.यामुळे विकासाच्या दिशेने ठोस पाऊले उचलली जात आहेत. आणि येणाऱ्या काळात आणखी प्रगती होण्याची आशा आहे या पुलाच्या मंजुरी मार्गातील सर्व अडथळे दूर करून पहिला टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.ज्यामध्ये स्थानिक ग्रामस्थांची महत्त्वाची भूमिका होती. आता दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक ६.५ कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आधीच मंजूर केला आहे. अशी माहिती ही आमदार नितेश राणे यांनी दिली.

त्याचबरोबर देवगड तालुक्यातील महत्वाचे असणारे देवगड निपाणी मधील देवगडचे प्रवेशद्वार असलेल्या नांदगाव ते देवगड पर्यंतच्या देवगड निपाणी रस्त्यासाठी ३३१ कोटी रुपयांचा निधी तर विजयदुर्ग तरळा या रस्त्यासाठी २८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सागितले.

देवगडपासून निपाणीपर्यंतचा रस्त्याची अनेक वर्षांपासून मागणी होती, त्यालाही एल.ओ.ए मिळाले आहे. हा रस्ता देवगड तालुक्यातील सर्व गावांना जोडतो आणि यासाठी अंदाजे ३३१ कोटी रुपयांचा एल.ओ. ए मंजूर झाला आहे. अशा प्रकारच्या विकास कार्यांमुळे क्षेत्रातील जनजीवनात सुधारणा होईल आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळेल.तसेच विजयदुर्ग तरळा रस्त्यासाठीही २८२ कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे, ज्यामुळे देवगडच्या विकासात महत्त्वपूर्ण प्रगती होईल.

देवगडला एक पर्यटन तालुक्याची ओळख मिळवून देण्यासाठी युतीसरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. या विकास कार्यांच्या माध्यमातून पर्यटनाला वाव मिळेलचं त्याच बरोबर स्थानिक स्तरावर रोजगाराच्या अनेक संधी देखील निर्माण होतील.आंबा आणि इतर कृषी उत्पादनांच्या परिवहनाची व्यवस्था देखील सुलभ होईल, ज्यामुळे स्थानिक व्यापारी आणि शेतकऱ्यांना लाभ होईल. महायुती सरकार, भारतीय जनता पक्षासह, या सर्व विकासात्मक योजनांमध्ये मंजुरीसाठी सक्रियपणे योगदान दिले असल्याचे सांगत आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत. या सर्व प्रयत्नांनंतर देवगडचा चेहरा निश्चितपणे बदलणार आहे, ज्यामुळे विकासाला एक नवी दिशा मिळेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!