26.1 C
New York
Thursday, July 3, 2025

Buy now

पार्किंग केलेली ईर्टिका कार अज्ञाताने लांबविली

देवगड वाडा गावठण येथील घटना: अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

देवगड : तालुक्यातील वाडा गावठणवाडी येथे अज्ञात चोरट्याने गाडी मालक यांनी घराशेजारी वरच्या बाजूस असलेल्या रस्तावर उभी करून ठेवलेली ईर्टिका कार चोरीस गेली.यासंदर्भात देवगड पोलीस स्थानकात गाडी मालक यांनी तक्रार दिली असून देवगड पोलिसांनी अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .ही घटना २२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या मुदतीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा गावठणवाडी येथील उत्तम शशिकांत बिर्जे यांनी आपल्या मालकीची MH ०७ AG ४५७६ ही मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या कलरची ईर्टिका कार २२ सप्टेंबर रोजी घराच्या समोरील वरच्या बाजूच्या रस्त्याच्या शेजारी उभी करून ठेवली होती. त्यानंतर २२ तारीखला बिर्जे हे मुंबईला गेले होते. मुंबईहून २८ सप्टेंबर रोजी सकाळी ते गावी आले . सायंकाळी पडेल येथे जाण्यासाठी ते गाडीकडे गेले असता गाडी तिथे दिसून आली नाही. याबाबत गाडी मालक उत्तम बिरजे यांनी देवगड पोलीस स्टेशनमध्ये गाडी चोरीस गेल्याची तक्रार दिली असून देवगड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार आशिष कदम करत आहेत

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!