7.1 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

असलदे सोसायटीला ऑडीट वर्ग ” अ ” प्राप्त 

शेतक-यांच्या विश्वासामुळे सोसायटीची प्रगती – चेअरमन भगवान लोके 

कणकवली : असलदे सोसायटी ही शेतक-यांची संस्था आहे . गेल्या ३ वर्षात संस्थेची आर्थिक उलाढाल गतीमान पध्दतीने वाढून ७१ लाखांवर पोहोचली आहे. संस्थेचे कर्ज वाटप वाढले तरी १०० टक्के संस्था पातळीवर वसुली आपली संस्था आहे. गावातील शेतक-यांनी माझ्यावर आणि माझ्या सहका-यांवर बिनविरोध विश्वास टाकला , त्या विश्वासाला साजेशी कामगिरी संस्थेला प्राप्त झालेल्या ऑडीट वर्ग ” अ ” मधून दिसून येत आहे. त्याचे श्रेय सर्व माझ्या संचालकांना व गावातील शेतक-यांना जात आहे. असलदेतील शेतक-यांच्या विश्वासामुळे सोसायटीची प्रगती होत असल्याचे प्रतिपादन चेअरमन भगवान लोके यांनी केले.

असलदे ग्रामपंचायत येथील रामेश्वर सभागृहात रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड या संस्थेची सर्वसाधारण सभा चेअरमन भगवान लोके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , सरपंच चंद्रकांत डामरे, माजी चेअरमन प्रकाश परब ,खरेदी विक्री संघ संचालक पंढरी वायंगणकर,संचालक शत्रुघ्न डामरे , परशुराम परब , संतोष परब , उदय परब , विठ्ठल खरात, श्रीमती नरे , अनिल लोके , रघुनाथ लोके , संजय लोके , बाबाजी शिंदे , प्रदिप हरमलकर , प्रकाश आचरेकर , महेश लोके , मनोज लोके , सत्यवान लोके , गणेश तेली , दिनेश शिंदे , प्रशांत लोके . वासुदेव दळवी, तुषार घाडी ,बाबू वाळके , राजु राणे , प्रविण डगरे, सुरेश मेस्त्री , मनोहर खोत, सचिव अजय गोसावी आदींसह गावातील सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

सभेत वार्षिक संस्थेच्या झालेल्या उलाढालीबाबत लेखापरिषणबाबत वाचन करण्यात आले. संस्थेला प्राप्त झालेल्या ऑडीट वर्ग ” अ ” बाबत अभिनंदन ठराव मांडण्यात आला. तसेच चालु वर्षातील संस्थेला नफा लक्षात घेवून १० टक्के लाभांश वाटपाबाबत सर्वांमते वाटपाचा निर्णय घेण्यात आला.

 

यावेळी चेअरमन भगवान लोके म्हणाले , असलदे सोसायटी गेल्या ३ वर्षात आदर्श सोसायटी म्हणून या संस्थेची सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओळख निर्माण झाली. ५९ वर्षांनी संस्थेच्या वाटचालीस प्रथमच आपल्या सोसायटीला ऑडीट वर्ग ” अ ” मिळाला आहे. ज्यावेळी आम्ही पदभार स्विकारला त्यापूर्वी संस्था ” क ” वर्गात होती. आता गेली २ वर्षे ” ब ” वर्ग आणि चालु आर्थिक वर्षातील संस्थेने केलेले काम ,व्यवहारातील पारदर्शकता , कर्ज वाटप , कर्ज वसुली , नवीन सभासद , सीएसी सेंटर या कामांचे मुल्यमापन होवून लेखापरिषण अहवालात संस्थेला “अ” वर्ग प्राप्त झाला ही गावाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. आपली संस्था तालुक्यात बॅंक व संस्था पातळीवर वसुली मध्ये नंबर १ आहे. सीएससी सेंटरला जातीचे दाखले काढण्याचा आयडी महाऑनलाईनकडून आपल्याला मिळाला आहे, हळूहळू दाखल्याचे काम आपल्या सीएससी सेंटर वर होणार आहे. शेतक-यांना ताडपत्र्या सोयीच्या दरात विकल्या आणि संस्थेलाही नफा झाला आहे.

यावेळी सभेत संस्थेच्या हित जोपासण्याच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभा खेळीमेळीत पार पडली. उपस्थितांचे आभार व्हा. चेअरमन दयानंद हडकर यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!