8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

न्यायालयीन कर्मचा-यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ संपन्न

मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प, सन्मानपत्र व रोख बक्षीस देवुन करण्यात आले सन्मानित

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी न्यायालयीन कर्मचा-यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पदविका परिक्षेत ७०% टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या गुणवंत पाल्यांचा संघटनेचे अध्यक्ष महेश माणगांवकर, उपाध्यक्ष दिनेश खवळे, सरचिटणीस चेतन अरवारी, सहचिटणीस महेश भाटकर आणि इतर मान्यवरांचे हस्ते गुलाबपुष्प, सन्मानपत्र व रोख बक्षीस देवुन सत्कार करण्यात आला.

गुणवंत पाल्यांमध्ये अभियांत्रीकी पदवी प्राप्त कु. साहिल शीतल सबनीस, कु. वैशाली रामचंद्र आरेकर, कु. ओंकार भालचंद्र हरकुळकर, कु. यश महेश माणगांवकर व कु. अनुष्का अजित जाधव, अभियांत्रीकी पदवीका प्राप्त कु. जस्मीन फान्सीस मेंडीस, पदवी प्राप्त, कु. अलिशा फान्सीस मेंडीस, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र प्राप्त कु. श्रावणी राजेंद्र मणचेकर, कु. मानसी अनिल हनमशेठ, कु. हर्षदा भालचंद्र हरकुळकर, कु. यश संतोष मडवळ, कु. तन्वी केदार म्हाडगुत, कु. आर्या मश्चिंद्रनाथ गबरे, कु. चिन्मयी संतोष पाटील, कु. श्रुती जगदीश सावंत, कु. युगा अरुण चव्हाण, कु. सुयोग सुहास पई, माध्यमिक प्रमाणपत्र प्राप्त कु. अनुष्का सदाशिव पालव, कु. तन्वी रामचंद्र आरेकर, कु. चिन्मय दत्तप्रसाद तवटे, कु. सावरी सुशांत परब, कु. श्रेया सुनील तांबे, कु भैरवी बाबाजी अडुळकर, कु. पावनी निळकंठ मालणकर, कु. तन्वी गंगाधर तांबे, कु. सार्थक सिताराम सावंत आदींचा समावेश होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सरचिटणीस चेतन अरवारी यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!