भव्य विसर्जन मिरवणुकीत निलेश राणे सहभागी..
कुडाळ : सतरा दिवसांच्या चैतन्यमयी वास्तव्यांनंतर आज सिंधुदुर्ग राजाचे पावशी येथील तलावात अगदी भक्तिमय वातावरणात करण्यात आले.सिंधुदुर्ग राजाची विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटामाटात आणि डीजे, बँजोच्या तालावर, फटाक्यांच्या आतषबाजीत निघाली या विसर्जन मिरवणुकीमध्ये भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे सहभागी झाले होते.
कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून या गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी १७ दिवस या गणरायाची सेवा करण्यात आली. आज सोमवार २३ सप्टेंबर रोजी गणरायाच्या १७ व्या दिवशी विसर्जन करण्यात आले या विसर्जन मिरवणुकी पूर्वी महाआरती करण्यात आली. तसेच भाजप नेते निलेश राणे येत्या निवडणुकीमध्ये बहुमताने निवडून यावे असे मागणे गणरायासमोर करून महायुतीची सत्ता यावी असे मागणे करण्यात आले. ही विसर्जन मिरवणूक भाजप कार्यालय या ठिकाणाहून सुरू झाली ती राजमाता जिजाऊ चौक, गांधी चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गुलमोहर हॉटेल पासून पावशी तलावापर्यंत काढण्यात आली. यावेळी ही शान कोणाची….. सिंधुदुर्ग राजाची….. सिंधुदुर्ग राजाचा विजय असो….. गणपती बाप्पा मोरया….. पुढच्या वर्षी लवकर….. या अशा जयघोषित फटाक्यांच्या आतषबाजी आणि डीजे, बँजोच्या तालावर विसर्जन मिरवणूक करण्यात आली. या विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकारी तसेच गणेश भक्त सहभागी झाले होते.