१५ सप्टेंबर पासून १२ वाजता सुटणारी बसच सुटली नाही ; आजची देखील तीच परिस्थिती
कणकवली : ऐन गणेशोत्सव सुरू असतानाचा कणकवली एसटी बस स्थानकातून सुटणाऱ्या बस गाड्या काल पासून उशिराने धावत आहेत. बस स्थानक प्रमुखांशी संपर्क केला असता त्यांनी गणेशोत्सव आणि जादा गाड्यांचे कारण पुढे केले. मात्र कणकवली तालुक्यातील बहुतांश गाड्या ह्या उपलब्ध असताना देखील रद्द केल्यामुळे प्रवाशांनी नाराजीचा सुरू बस स्थानकातच धरला होता. शिवडाव सारख्या खेडेगावात १५ सप्टेंबर पासून ११:४० वाजता सुटणारी बसच गेलेली नाही. बस उपलब्ध नाही हे कारण सांगण्यात आले. मात्र पहाणी केली तेव्हा १० ते १५ बस गाड्या बस डेपोत उभ्या असल्याचे चित्र समोर आले. मात्र बस चे नियोजन करणारे श्री. चव्हाण यांच्याशी संवाद साधला असता ते जणू आपण प्रवाश्यासोबत बोलत आहोत अशा भूमिकेत बोलत होते.
शिवडाव मार्गावर आज सकाळी ७:४०, दुपारी ११:४० वाजता धावणारी बस १५ सप्टेंबर पासून बंदच असल्याचे रजिस्टर देखील श्री. चव्हाण यांनी दाखवले. मात्र या अधिकाऱ्यांच्या खेचाखेचीत शिवडाव – हळवल मार्गावरील प्रवाश्यांना खाजगी वाहनांना ५०० ते १००० रु देऊन प्रवास करावा लागत आहे.
जेव्हा या सगळ्या गोष्टींचा पोलखोल झाला तेव्हा एसटीचे इंचार्ज श्री. परब यांनी एक बस सोडण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र तेव्ह कुठे हम करो सो कायदा करणाऱ्या त्या अधिकऱ्याने नमती बाजू घेतली. शिवडाव बस चा प्रश्न देखील कायमच प्रलंबित राहिलेला आहे.
बस बाबत विचारणा केली तर केवळ शिवडाव बसचा प्रश्न नेहेमीच चर्चेत असतो. विभागीय नियंत्रक देखील या कारभाराकडे लक्ष देत नाहीत. किमान आता तरी प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष देऊन होणारी गैरसोय दूर होईल अशी अपेक्षा.!