कणकवली : गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत गणेशभक्तांनी रविवारी सायंकाळी दीड दिवसाच्या गणरायांना निरोप दिला. नदीकाठी बच्चे कंपनी देखील बाप्पाचे विसर्जन पाहण्यासाठी उपस्थीत होती.यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.
कणकवली तालुक्यातील विविध ठिकाणी असलेल्या गणेशमूर्ती विसर्जनस्थळी रविवारी गर्दी झाली होती. कणकवली शहरालगत जानवली नदीवरील गणपती साना, मराठा मंडळ येथील केटी बंधारा येथे विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती. शनिवारी गणेशचतुर्थी दिवशी गणरायाचे घरोघरी आगमन झाले. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्य व मंगलमय वातावरण आहे. सायंकाळी दीड दिवसाच्या गणरायांना निरोप देण्यात आला.