कणकवली | मयुर ठाकूर : अलीकडे सण उत्सव म्हटलं की लाऊड स्पीकर, ढोल – ताशा आणि फटाके अशा पद्धतीची मज्जा करत असताना पहायला मिळतं. मात्र कणकवली शहरात गणेशोत्सवा दिवशीच गणपतीचा बाप्पाचे आगमनाचे वेळी कणकवली शहरातील एक २२ वर्षीय तरुण आनंदाच्या भरात हातात ऑटोमबॉम्ब लावत होता. दरम्यान तो ऑटोमबॉम्ब हातातच फुटला. ऑटोमबॉम्ब हातात फुटल्याने हात पूर्णपणे रक्त बंबाळ झाला होता. तातडीने त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती कणकवली उपजिल्हा रुग्णालयचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. पंकज पाटील यांनी दिली.
यावेळी डॉ. पाटील म्हणाले की, सध्या गणेशोत्सव सर्वच ठिकाणी मोठ्या आनंदात आणि उत्साहात सुरू आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीने आपल्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. हातातून फटाके फोडणे शक्यतो टाळलेच पाहीजे. कारण अशा प्रकारांनी काहींना आपले अवयव गमवावे लागले आहेत. त्यामुळे फटाके लावत असताना लहान मुलांची काळजी घ्या. असे आवाहन कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. पंकज पाटील यांनी केले.