भारतीय जनता पक्षाचा झेंडा दाखवल्यानंतर मोदी एक्सप्रेस निघाली
आमदार नितेश राणेंनी केली चाकरमान्यांची विचारपूस
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : गणेश चतुर्थीचा सण म्हटला की चाकरमानी गावी येतात. मात्र या प्रवासादरम्यान बुकिंग मोठ्या प्रमाणात असल्याने तिकीट मिळत नाही. त्यामुळे फार मोठी कसरत करावी लागते. याच दरम्यान कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी या प्रवाश्यांना प्रवास सुलभ व सुखकर व्हावा यासाठी तीन तालुक्यातील चाकरमान्यांसाठी सलग १२ व्या वर्षी गणेशोत्सवानिमित आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून सोडण्यात आलेली मोदी एक्सप्रेस दादर स्टेशन येथुन प्रवाश्यांना घेऊन सिंधुदुर्ग च्या दिशेने येण्यासाठी रवाना झाली.
या मोदी एक्सप्रेसला भारतीय जनता पार्टीचा झेंडा दाखवत आ. नितेश राणे यांनी शुभारंभ केला. यावेळी मोदी एक्सप्रेसमध्ये जाऊन आ. नितेश राणे यांनी चाकरमान्यांची विचारपूस केली. आपुलकीचे शब्द ब-याच चाकरमान्यांना आ. नितेश राणे यांनी विचारत एक जिव्हाळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मोदी एक्सप्रेस जाहीर केलेल्या नियोजनानुसार सकाळी १० प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन रवाना झाली. या मोदी एक्सप्रेसला चाकरमान्यांनी उदंड असा प्रतिसाद दिला.
कणकवली विधानसभेतील तिन्ही तालुक्यातील चाकरमान्यांनी या मोदी एक्सप्रेसचा लाभ घेतला. आ. नितेश राणे यांनी मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून केलेली प्रवासाची सोय अनेक कुटंबियांच्या फायद्याची ठरली आहे. वाढत्या महागाईच्या काळात आ. नितेश राणे यांनी प्रवासाची सोय करत हातभार लावत मदतीचा खारीचा वाटा उचलला आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून आ. नितेश राणे यांचे आभार देखील मानले जात आहेत.