27.9 C
New York
Tuesday, August 26, 2025

Buy now

एलसीबी पोलिसांनी केला ऑफिक फोडणाऱ्याचा पर्दाफाश

कोल्हापूर | यश रुकडीकर : शिरोली एमआयडीसी येथील महिंद्रा कुरिअर ऑफिस फोडून अज्ञाताने रोख-रक्कम लंपास केली होती.ह्या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना ही चोरी त्या ऑफिसमधेच काम करणाऱ्या ऑफिसबॉयने केली असल्याचे निष्पन्न झाले.सदर ऑफिसबॉयला ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने नाव पंकज कुंतीलाल कल्याणकर ,वय २३,राहणार आर. के.नगर,पाचगाव असे सांगितले.त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.या गुन्ह्याचा पुढील तपास शिरोली एमआयडीसी पोलिस करत आहेत.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामचंद्र कोळी,सागर माने, सोमराज पाटील,लखन पाटील,शुभम संकपाळ,परशुराम गुजरे यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!