-0.4 C
New York
Friday, February 13, 2026

Buy now

नांदगाव येथे दुकानावर वृक्ष कोसळला,७० हजाराचे नुकसान 

कणकवली : तालुक्यातील नांदगाव वाघाची वाडी येथील व्यापारी वामन धोंडू म्हसकर यांच्या दुकान घरावर वृक्ष कोसळून सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना काल सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच भाजपा माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे, विठोबा कांदळकर, राजू खोत, माजी सरपंच पंढरी पारकर, संजय पाटील, मंगेश परब, तलाठी सुदर्शन अलकुटे आदींनी भेट देत माहिती घेतली. या नुकसानीची पंचनामा तलाठी अलकुटे यांनी केला आहे. एकूण ७० हजार रुपये नुकसान झाले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!