कुडाळ : बदलापूर येथे चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारायच्या पार्श्वभूमीवर आज कुडाळमध्ये ठाकरे गट शिवसेनेच्या माध्यमातून शाखा कार्यालय येथे तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मुक आंदोलन करण्यात आले. तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून शासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, उप जिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, नगरसेवक उदय मांजरेकर, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, शहर प्रमुख संतोष शिरसाट आदी उपस्थित होते.







