सावंतवाडी : महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकी प्रमाणे विधानसभेला जो कोण उमेदवार असेल त्याचा प्रचार करून त्याला प्रामाणिक निवडून आणण्याचा आम्ही काम करणार, आमचं ध्येय फक्त भाजप व शिंदे गटाचा पराभव करण्याचा आहे असे विधान महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
दरम्यान, सत्ताधारी पक्षातील भाजप दीपक केसरकर यांच्या अपयशाच्या नावाने आरडाओरड करत आहेत. परंतु, ते करताना भाजप देखील सत्तेत आहे याचा विसर त्यांना पडत आहे असा खोचक टोला यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या नेत्यांना व दीपक केसरकर यांना हाणला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी (श.प.)तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, कॉग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शिवसेना संघटक मायकल डिसोझा, शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, देवा टेमकर, काशिनाथ दुभाषी आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की महाविकास आघाडीतर्फेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढवली जाणार आहे. शिवसेना भाजप हे एकमेकावर दगड फोडण्याचे काम करत आहेत अशी टीका त्यांनी यावेळी केली.
तसेच दीपक केसरकर हे देशाचे प्रवक्ते आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे उजवे आहेत. मग तुम्ही विकास कामे करायला विसरला आहात का की फक्त जमिनी लाटण्याचे काम तुमचे सुरू आहे असा सवालही त्यांनी केला. भाजप केंद्रात व राज्यात सत्ता असताना तुम्ही मंत्री केसर करांवर विकास कामावर दगड का पडता तुम्ही विकास का केला नाही असा सवालही त्यांनी केला.