8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

आगीत जळालेल्या मोबाईल दुकानाची आ. नितेश राणेंनी केली पहाणी

कणकवली | मयुर ठाकूर  : कणकवली पटवर्धन चौकातील लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मधील मोबाईल शॉपी जळून खाक झाल्याच्या पार्श्वभूमीवर आ. नितेश राणे यांनी सोमवारी दुपारी त्या मोबाईल शॉपी ला भेट देत पाहणी केली. तसेच त्या दुकान मालकांशी संवाद साधला.

आ. नितेश राणे म्हणाले, कणकवली शहरातील नगरपंचायत च्या भाजी मार्केट सह अन्य नवीन इमारतींमध्ये अग्निशमन सुविधा किती महत्त्वाची आहे या संदर्भात मी वारंवार केलेली मागणी अधोरेखित होत आहे. या बाबत सुप्रीम कोर्टाचे निर्णय व यापूर्वी मी विधानभवनात केलेली मागणी याची आठवण देखील श्री राणे यांनी करून दिली. जेणेकरून शहरातील व्यापारी व त्यांची दुकाने सुरक्षित रहावे या दृष्टीने ही मागणी केली होती. कणकवलीतील भाजी मार्केट मध्ये देखील या अग्निशमन सुविधे ची मागणी केली. त्याचे महत्त्व आता अधोरेखित झाल्याचा उल्लेख देखील आमदार नितेश राणे यांनी केला. याप्रसंगी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी श्री खत्री, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगरसेवक किशोर राणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, बंडू गांगण, पंकज पेडणेकर, राजा पाटकर, नवराज झेमने, व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, विलास कोरगावकर, राजेश राजाध्यक्ष, समीर प्रभूगावकर आदी उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!