कणकवली : कणकवली शहरात चोवीस वर्षापासून संगणक क्षेत्रात अग्रेसर असलेले प्रशिक्षण केंद्र उच्च दर्जाचे अनेक वर्षे हजारो मुलांना आधुनिक तंत्र ज्ञानाचे शिक्षण देत आहे शासकीय व निमशासकीय क्षेत्रात स्टेटस कॉम्पुटर्स चे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत.
आधुनिक काळाची गरज ओळखून स्टेटस कॉम्पुटर्स च्या संचालिका सौ .जुई जगन्नाथ वळंजू यांनी आधुनिक काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यासाठी विविध शिष्यवृत्ती परिक्षेचे आयोजन केलेले आहे दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी कणकवली कॉलेज येथे संगणक क्षेत्रातील शिष्यवृत्ती परिक्षा आयोजित करून अनेक विद्यार्थांनी परिक्षेचा लाभ घेतला ही परीक्षा संगणक माहिती व सामान्य ज्ञान यावर आधारित होती .
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील केंद्रावर संगणक क्षेत्रातील बुधिमत्ता वाढविण्यासाठी परीक्षा आयोजित करून स्टेटस कॉम्पुटर्सने संगणक प्रशिक्षण क्षेत्रातील आधुनिक क्रांतीच निर्माण करून विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रातील ज्ञानाच्या शाखा खुल्या करून दिल्या .
सर्व परिक्षेतून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे फ्रेंडशिप दिनांचे औचित्य साधून निकाल जाहिर केला व सर्वांचे अभिनंदन केले या कार्यक्रमाला स्टेटस कॉम्पुटर्सचे सर्व कर्मचारी व संचालक उपस्थित होते.