4.6 C
New York
Saturday, March 14, 2026

Buy now

खारेपाटण कॉलेजची माजी विद्यार्थिनी तेजस्वी दत्तात्रय नामये हिची सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात निवड

खारेपाटण : पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण ची कु. तेजस्वी दत्तात्रय नामये (माजी विद्यार्थिनी) रा. शिडवणे ता. कणकवली हिची सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात निवड झाली. कुमारी तेजस्वी नामये खारेपाटण कॉलेज मधील हुशार विद्यार्थिनी होती.तसेच तिने क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तुंग यश प्राप्त केले होते. सुरुवातीपासूनच पोलीस दलात सेवा करण्याचे स्वप्न होते, ते तिने सत्यात आणले.

तिच्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीणजी लोकरे, उपाध्यक्ष- श्री भाऊ राणे,सचिव श्री महेशजी कोळसुळकर, सहसचिव श्री.राजेंद्र उरणकर व संस्थेचे सर्व पदाधिकारी ,खारेपाटण प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.संजय सानप, पर्यवेक्षक श्री राऊत सर, सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ.ए. डी. कांबळे सर्व शिक्षकवृंद यांनी पुष्पगुच्छ देऊन कुमारी. तेजस्वीचे हार्दिक अभिनंदन केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!