23.1 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

CEIR पोर्टल च्या मदतीने ५ मोबाईल शोधण्यात कणकवली पोलिसांना यश 

पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांचे होतेय कौतुक 

कणकवली | मयुर ठाकूर : अनेकदा मोबाईल चोरीला जातात मात्र काही लोकाना चोरीला गेलेले मोबाईल पुन्हा सापडतात याची कल्पना नसते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलीस ठाणे हे मोबाईल शोधून काढण्याच्या बाबतीत अव्वल ठरले आहे. १३ ऑगस्ट रोजी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली CEIR पोर्टल च्या मदतीने कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी यशस्वी मार्ग काढला.

यामध्ये निलेश पारकर यांचा Vivo २७ – रायगड किंमत ३२,०००, नीलिमा प्रभुदेसाई readme – राजस्थान किंमत १२,०००, विकास भिस्नोई samsung कर्नाटक किंमत १३,०००, सुबोध कुलकर्णी Samsung कर्नाटक किंमत ११,०००, सिद्धेश गुरव ralme कणकवली किंमत १५,००० एकुण ९३००० रुपये किमतीचे मोबाईल मालकांना पुन्हा परत मिळवून दिले आहेत. त्याबद्दल पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांचे व कणकवली पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!