4.4 C
New York
Friday, March 13, 2026

Buy now

कोलकत्ता मेडिकल कॉलेजच्या महिला डॉक्टरांवर झालेल्या घटनेचा कणकवलीत निषेध

डॉक्टर्स फ्रायडे क्लब कणकवली व आम्ही कणकवलीकर यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

कठोरात कठोर कारवाई करण्याची केली मागणी

कणकवली : कोलकत्ता मेडिकल कॉलेज मधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार व क्रूर हत्येचा जाहिर निषेध करण्यासाठी कणकवली शहरात शनिवारी सायंकाळी मूक मोर्चा काढण्यात आला. डॉक्टर्स फ्रायडे क्लब कणकवली व आम्ही कणकवलीकर यांच्यावतीने कळ्या फिती बांधून कणकवली पटवर्धन चौक येथून कणकवली प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच सदरच्या घटनेचा निषेध करण्यात आला.

यावेळी कणकवली उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांना दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर्स फ्रायडे क्लब कणकवली व आम्ही कणकवलीकर यांच्यावतीने निवेदन देवून करण्यात आली.

यावेळी डॉक्टर्स फ्रायडे क्लब कणकवली डॉ. विद्याधर तायशेटे, सेक्रेटरी डॉ. विनय शिरोडकर, डॉ. नितीन शेटये, डॉ. प्रवीण बिरमोळे, डॉ. एस. एम. तायशेटे, आम्ही कणकवलीकरचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, जेष्ठ नागरिक संघाचे दादा कुडतरकर, डॉ. दादासो आबदार, डॉ. प्रतिमा नाटेकर, डॉ. शमिता बिरमोळे, डॉ. हेमा तायशेटे, डॉ. प्राजक्ता तेली , डॉ. मीनल आपटे, अमिता कुलकर्णी , डॉ. रश्मी पेंढुरकर, डॉ. दिपाली वळजू , डॉ. संतोष राणे, डॉ. नीता कारंडे, डॉ. परुळेकर, शैला मुखरे, श्रद्धा कदम, पूजा सावंत, सह उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलिस उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, दाजी सावंत, मंगेश बावदाने, सागर मासाळ, विनोद चव्हाण, रुपेश गुरव, मनोज गुरव आदी उपस्थीत होते.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!