देवगड : तालुक्यातील किंजवडे बाईतवाडी येथील नादुरुस्त झालेल्या साकवाची आमदार नितेश राणे यांनी आज पहाणी केली. हा साकव दुरुस्त होण्यासाठी निधी देऊ असेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले आहे. किंजवडे बाईतवाडी येथील नादुरुस्त साकव प्रश्नावरून युवक काँग्रेसने 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. देवगड दौऱ्यावर असलेल्या आमदार नितेश राणे यांनी या साकवाची पाहणी केली. एखाद्याला काम करू द्यायचे नाही, आणि केले नाही म्हणून आरोप लावायचे, महाविकास आघाडीची सत्ता व त्यांचा पालकमंत्री असताना झालेले पत्रव्यवहार मला उघड करावे लागतील. मग जनतेलाही कळेल की हा साकव कोणामुळे नादुरुस्त राहिला आहे. अशा शब्दात त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका केली आहे. हे तपशील उघड केले तर उपोषणाची भाषा करणाऱ्यांना गावात फिरणे ही मुश्किल होईल असा उपरोधिक टोलाही आमदार नितेश राणे यांनी मारला आहे.
साकव नादुरुस्त राहण्यासाठी कोण जबाबदार ! याचे कागदोपत्री पुरावे माझ्याकडे असून ते उघड करावे लागतील असा इशाराही आमदार नितेश राणे यांनी दिला आहे
आपण ही साकव दुरुस्ती लवकरात लवकर करून देऊ असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले