3.9 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील १७ पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या सतरा पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती देऊन कोकण परिक्षेत्रात नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. या भरतीचे आदेश राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक के मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी गुरुवारी दिले. राज्यातील 610 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढत्या देण्यात आले असून एवढ्या मोठ्या प्रमाणात बढत्या झाल्यामुळे पोलीस दलात आनंद व्यक्त होत आहे.

या बढती मध्ये सिंधुगातील 17 पोलीस आमदारांचा समावेश आहे. यामध्ये विलास कुंभार, मोहन पेडणेकर, बापू खरात, सुधीर कदम, मोहन चव्हाण, वासुदेव परब, भिवाजी सावंत, सुधीर सावंत, अमोल सरंगले, रामचंद्र शेळके, अजय घाटकर, शेखर दाभोलकर, नितीन कदम, महेश देसाई, भालचंद्र आंदोलेकर, प्रसाद सावंत व राजेंद्र राणे या पोलीस समलदारांना बढत्या मिळाल्या आहेत.
सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेवाळे यांनी या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून या जिल्ह्यात मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी काम केले होते. त्यांच्या कार्यकाळात या सर्व पोलिसमलदारांनी काम केले असल्यामुळे व त्यांनीच हे भरतीचे आदेश काढल्यामुळे या भढती झालेल्या अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!