8.8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

बेळणे खुर्द येथील चोरीप्रकरणी एकाला अटक

कणकवली : बेळणे खुर्द येथील बंद फॅब्रिकेशन फॅक्टरीमध्ये प्रवेश करत ८३ हजार ५०० रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याप्रकरणी त्या फॅक्टरीच्या शेजारी भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या संदीप पांडुरंग चाळके (३९) या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

या चोरी प्रकरणी फॅक्टरीचे मालक सतीश सीताराम दळवी (मूळ राहणार बेळणे खुर्द, वरचीवाडी, सध्या राहणार मुंबई) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

सतीश दळवी यांच्या फॅक्टरीच्या शेजारी भाड्याच्या खोलीत संदीप चाळके कुटुंबीयांसह राहतो. २८ जुलै रोजी फॅक्टरीमधून आवाज येत असल्याने आपण तिथे जाऊन पाहिले असता पाठीमागील भिंतीच्या मोकळ्या जागेतून एक व्यक्ती पळताना दिसून आला असल्याचे सतीश दळवी यांना संदीप याने फोनद्वारे सांगितले होते. त्यानंतर सतीश दळवी यांनी मुंबईवरून बेळणे येथे येऊन फॅक्टरी मध्ये जात पाहणी केली. त्यावेळी तेथील काही साहित्य चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात नोंदविली. पोलिसांना तपासादरम्यान गोपनीय सूत्रांद्वारे संबंधित चोरी संदीप चाळके यानेच केल्याची माहिती मिळाली.

त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी अंती अटक करण्यात आली. त्याला बुधवारी कणकवली न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. या चोरी प्रकरणात त्याच्या सोबत आणखीन कोणी सहभागी होते का?, याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हवालदार पांडुरंग पांढरे, चंद्रकांत झोरे करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!