8.7 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

असलदे गावातील वीज समस्या न सोडवल्यास नांदगाव कार्यालयाला टाळे ठोकणार

वीज वितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता विलास बगडे यांना असलदे ग्रामस्थांचा इशारा

कणकवली : असलदे ‌गावात अतिवृष्टीत २५ ते ३० ग्राहकांचा मीटर जळून खाक झाले आहेत. ते वीज मीटर विनाशुल्क ग्राहकांना बदलून मिळावेत. वीज लाईनवर आलेली झाडी कटींग करण्यात यावी. अधिकारी व कर्मचारी वीज ग्राहकांचे फोन उचलत नाहीत . तसेच ग्राहकांशी उद्धट बोलतात, त्यांना समज देण्यात यावी. वीजेचा लपंडाव गावात सुरु आहे, गेले दोन दिवस अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा गावातील खंडीत झाला आहे. गावातील अनेक पोल जीर्ण झालेले असून धोकादायक बनलेले आहेत. असलदे गावातील वीज समस्या न सोडवल्यास नांदगाव कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा वीज वितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता विलास बगडे यांना ग्रामस्थांनी दिला आहे.त्यावर कार्यकारी अभियंत्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

कणकवली येथील वीज वितरणाच्या उपविभागीय कार्यालयात असलदे ग्रामस्थांनी धडक दिली.यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , माजी सरपंच पंढरी वायंगणकर , सोसायटी संचालक उदय परब ,छत्रुघ्न डामरे , गणेश काटकर , महेश लोके , रघुनाथ लोके , मनोज लोके , प्रकाश आचरेकर , दिनेश शिंदे , विजय आचरेकर , संदीप शिंदे , वासुदेव दळवी , संतोष मयेकर , रोहीत परब , विजय मयेकर , ग्रामसेवक संजय तांबे , मधुसुदन परब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

गावातील अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झालेला असताना कर्मचारी लक्ष देत नाहीत. विद्युत पुरवठा होत असलेल्या लाईनवर अनेक ठिकाणी फांद्या लागत असून काही ठिकाणी कमी दाबाने विद्युत पुरवठा होत आहे. लाईट गेल्यानंतर किती वेळात येईल,याची माहिती ग्राहकांना मिळण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात यावा. त्याची कल्पना ग्राहकांना देण्यात यावी. गावात गणेश मुर्त्या बनवण्याच्या शाळा सुरु आहेत,त्या ठिकाणी काम करताना वीज खंडीत होत असल्याने मूर्तीकारांसमोर अडचणी निर्माण होत आहे. या सर्व समस्या येत्या पंधरा दिवसांत वीज वितरण कंपनीने सोडवाव्यात, गणेश चतुर्थी पूर्वी विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा नांदगाव येथील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!