बदली पात्र सर्व शिक्षकांची सेवाजेष्ठ प्रारूप यादी जाहीर होणार ; जिल्हा परिषद सीईओ मकरंद देशमुख
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : जिल्हातील विविध शिक्षक संघटना सद्या आक्रमक मोडवर आहेत. शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागावे असा प्रत्येक संघटनेचा प्रयत्न आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन कोणत्याही शिक्षकांवर अन्याय न होता आंतरजिल्हा बदल्या, जिल्हा अंतर्गत बदल्या व नवीन शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या याची प्रक्रिया करण्यासाठी ॲक्टिव मोडवर कार्यरत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख जिल्हा नियोजन समिती सभागृहात दिलेला पूर्ण करू व सर्व शिक्षकांना न्याय मिळेल असे पारदर्शक काम करू असेही त्यानी सोमवारी सांगितले.
राज्य शासनाने शिक्षक बदल्यांचे धोरण निश्चित केल्यानंतर त्या परिपत्रकाची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र दोन वेळच्या निवडणुकाच्या आचारसंहिता यामुळे ही प्रक्रिया लांबत गेली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, जिल्हा अंतर्गत बदल्या व नवीन शिक्षकांच्या नियुक्त्या हे तीनही प्रश्न 31 जुलै पर्यंत सोडविले जातील अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिली होती. त्यानुसार आंतरजिल्हा बदलीस पात्र ठरणाऱ्या शिक्षकांची यादी तयार करणे व समुपदेशन प्रक्रिया राबविणे व त्यानंतर नवीन शिक्षण सेवकांच्या नियुक्ती करणे ही सर्वच प्रक्रिया युद्ध पातळीवर शिक्षण विभागाने हाती घेतली आहे.
मागील लोकसभा निवडणूक व त्यानंतर आलेली कोकण पदवीधर निवडणूक या दोन निवडणुकांच्या आचारसंहिता काळात अडकलेल्या या प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे रेंगाळत गेल्या. दरम्यान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षकांच्या बदल्यांबाबत सहानुभूतीपूर्वक शासन परिपत्रक काढून सूचना दिल्या. आंतरजिल्हा बदल्यातील शिक्षकांना कार्यमुक्त करावे, त्यानंतर जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी व त्यानंतर नवीन शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या द्याव्यात या परिपत्रकाची अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुरू झाली आहे. याची चर्चाही जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाली होती. व या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी व जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले असे आदेश पालकमंत्र्यांनी या सभेत दिले होते.
दरम्यान पवित्र पोर्टल द्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 615 शिक्षण सेवकांच्या भरतीची यादी शासनाकडून आली होती. त्यापैकी 543 शिक्षण सेवक नियुक्तीची प्रक्रिया शिक्षण विभागाने पूर्ण केली. त्यामुळे अनेक शाळांना शिक्षण सेवकांचे बळ मिळाले होते. व काही शाळा शिक्षकांअभावी शिक्षकांच्या रिक्त पदामुळे अनेक शाळाना शिक्षकच नव्हते. मात्र या शिक्षण सेवकांच्या नव्या नीयुक्तांमुळे शिक्षकांचा प्रश्न थोडा का होईना मार्गे लागला आहे. आता आंतरजिल्हा बदलीचे 147 शिक्षक या जिल्ह्यातून कार्यमुक्त होण्यासाठी प्रक्रियेत आहेत. या शाळा पुन्हा रिक्त होणार आहेत. त्यामुळे अंतर्गत जिल्हा बदलीसाठी पात्र ठरणाऱ्या शिक्षकांना जवळपासच्या शाळा मिळण्याचा मार्ग आणखी सुकर होणार आहे. व्यक्त होणाऱ्या जिल्ह्यातील शाळांवर सेवा जेष्ठता यादीतील क्रमानुसार त्या त्या शिक्षकांचा हक्क राहणार आहे. त्यामुळे अवघड क्षेत्रात असणाऱ्या सर्वच शिक्षकांना सोयीची शाळा मिळण्याची संधी पुन्हा चालून आली आहे. बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या शाळांवरती नव्या शिक्षण सेवकांना सोयीची शाळा निवडण्याची संधी मिळणार आहे. या सर्व प्रक्रियेत प्रशासनाला दुर्गम तालुका असणाऱ्या देवगड आणि दोडामार्ग या तालुक्यातील शाळा रिक्त राहू नये म्हणून प्रयत्न करावा लागणार आहे.
मधल्या काळात जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली होती. या समुपदेशन प्रक्रियेला शिक्षक संघटना व शिक्षकांनी आक्षेप घेतला होता. याची चर्चाही जिल्हा नियोजन समिती सभेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घडवून आणली होती. शासन निर्णयाप्रमाणे बदली प्रात्र शिक्षकांचे पुन्हा समुपदेशन घेऊन जिल्हा अंतर्गत बदल्या कराव्यात असे आदेशही त्यांनी दिले होते. यामध्ये पुन्हा पूर्वी झालेले समुपदेशन हा कळीचा मुद्दा शिल्लक होता. याबाबत प्रशासन शिक्षक संघटना व ते शिक्षक यांनी हा मुद्दा समोरच्याराणे सोडविणे आवश्यक बनले आहे.