27.6 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

कणकवली तालुक्यातील पोलीस पाटील पदासाठी पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे द्या

कणकवली भाजपा पदाधिकाऱ्यांचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना निवेदन

कणकवली | मयुर ठाकूर : तालुक्यातील पोलीस पाटील यांच्या रिक्त पदांसाठी लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात आली होती. सदरची परीक्षा होऊन सुमारे चार महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र अद्यापही पात्र ठरलेल्या पोलीस पाटील पदाच्या उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आलेली नाहीत. सुरुवातीला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या थांबल्या असल्याचे सांगण्यात आले. सदर भरतीची नियुक्ती वेळेत झाली असती तर निवडणूक काळात प्रशासनास चांगले सहकार्य झाले असते. तसेच सध्याच्या शैक्षणिक प्रवेशासाठी पोलीस पाटलांच्या दाखल्यांचा ताण कमी झाला असता. कुडाळ प्रांताधिकाऱ्यांनी आपल्यानंतर भरती प्रक्रिया घेऊन नियुक्त्या दिलेल्या आहेत. आपल्या स्तरावरील नियुक्ती न झाल्याने उमेदवारांचे तीन महिन्यांच्या मानधनाचे नुकसानही झालेले आहे. सद्यस्थितीत कोणतीही आचारसंहिता लागू नसल्याने पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे केली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कणकवली शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, युवा मोर्चा भाजपा तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी, युवा मोर्चा भाजपा तालुका उपाध्यक्ष सुभाष मालंडकर, नयन दळवी, प्रज्वल वर्दम, अभय गावकर, समीर प्रभूगावकर, सचिन पारधिये, प्रज्ञेश राणे, संदीप सावंत – जानवली उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!