कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली तहसील कार्यालयामध्ये सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने चा लाभ मिळवण्यासाठी महिला लाभार्थी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी लाभार्थ्यांना गावपातळी वर उत्पन्नाचे दाखले मिळावेत यासाठी प्रत्येक सजावर तलाठ्यांना नोंद घालून पंचनामा करून त्याच्यावर उत्पन्नाची नोंद घालावी असे आदेश दिले आहेत. तसेच गावाच्या जवळील असणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रांमध्ये हे उत्पन्नाचे अर्ज लाभार्थ्यांनी जमा करावेत जेणेकरून लाभार्थ्यांचा वेळ वाचेल आणि त्यांना दाखले देखील तत्परतेने उपलब्ध होतील असे नियोजन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे खालील दिलेल्या आपल्या गावातील जवळील महा-ई-सेवा केंद्रांवर आपण जाऊन आपला उत्पन्न दाखला काढता येणार आहे.
महा-ई-सेवा केंद्र
खारेपाटण : भूषण कांबळे 9209637292
तळेरे : गौरी माळवदे 7888171017
साक्षी सुर्वे : 9834915672
नांदगाव : रामचंद्र लोके 9730308057
फोंडाघाट : गणेश तेली 9420154648
तरंदळे : विवेक सावंत 7507458720
ओसगाव : प्रवीण नाईक 9823400472
सांगवे : मंगेश कुलकर्णी 9421975145,
नरडवे : लक्ष्मण ढवळे 9405331719
कणकवली : सुप्रिया बिडये 7350234366
वागदे : गणेश पारकर 9561481418
कणकवली : मंगेश सावंत 9421267162
या वरील महा-ई-सेवा केंद्रांवर आपण उत्पन्न दाखला अर्ज घेऊन तलाठ्याकडे आपल्या उत्पन्नाची नोंद करावी व पुन्हा अर्ज त्याच महा ई सेवा केंद्र मध्ये जमा करावेत अशा सूचना तहसीलदार देशपांडे यांनी दिले आहेत.