-9.2 C
New York
Thursday, January 29, 2026

Buy now

सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी समीर ठाकूर यांची बिनविरोध निवड

उपाध्यक्षपदी साहिश अंधारी तर ; सचिवपदी अभिजित गुरव

कणकवली | मयुर ठाकूर :  सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेची जनरल सभा कुडाळ येथे पार पडली. विद्यमान कार्यकारणीचा कार्यकाळ संपल्यामुळे नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये कणकवलीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष समीर ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी साहिश अंधारी (कुडाळ), सचिवपदी अभिजित गुरव (कणकवली), सहसचिवपदी कैलास ठाकूर (सावंतवाडी), खजिनदारपदी शेखर कुंभार (कुडाळ), दीपक अनावकर (कुडाळ), जयराम राऊळ (देवगड), अमोल मुंडये (कणकवली), संदीप कदम (कणकवली), अनंत तळेकर (फोंडा), प्रशांत मठकर (वेंगुर्ला), विजय गवळी ( सावंतवाडी ), उमेश चव्हाण (मालवण) यांची जिल्हा कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे.

या सभेला जिल्ह्यातील बहुसंख्य औषध ज्येष्ठ कर्मचारी, आजी माजी पदाधिकारी, तसेच सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण घाडी यांनी केलं तर आभार शेखर कुंभार यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!