3 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

मुख्यमंत्री ‘ माझी लाडकी बहीण” योजनेची सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमलबजावणी करणार

माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांची माहिती

कणकवली | मयुर ठाकूर : विधानसभा अधिवेशन चालू असून राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. येणारी विधानसभा निवडणूक पाहता यावर्षीच्या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले होते. या अर्थसंकल्पात बेरोजगार तरुण या सोबतच शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्याचं दिसून येते. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल देखील सादर करण्यात आला. सदर अर्थ -संकल्पामध्ये महिला भगिनींसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांचे आभार मानत असल्याची माहिती माजी जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत या सह ज्या यंत्रणांमार्फत ही योजना राबविण्यात येणार, त्या यंत्रणांना भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य करून योजना प्रभावीपणे राबवली जाईल, असेही संजना सावंत यांनी सांगितले. खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावेळी संजना सदडेकर, प्राची कर्पे, करंजे सरपंच सपना मेस्त्री, मेघा सावंत, साक्षी वाळके, नागवे सरपंच सिद्धीका जाधव, प्रतीक्षा सावंत, आदी उपस्थित होत्या.

सगळ्यात महत्त्वाची योजना जी होती ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना! या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली. या योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिन्याला १५००/- रुपये देण्यात येणार आणि या योजनेसाठी सरकारकडून ४६००० कोटी रुपयांचा भरीव तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून ९५ लाख महिलांना या योजनेचा फायदा होईल असा अंदाज आहे. मोफत सिलेंडर दिले जाणार आहेत. यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत दिले जातील. अन्नपूर्णा योजना राबविण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणाला ही योजना पोषक ठरेल आणि ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबाला या योजनेचा लाभ होईल असं सुद्धा अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे.

राज्यातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी सरकारकडून निधी सुद्धा उपलब्ध करून दिला. महाराष्ट्रामध्ये सहा लाखाहून अधिक महिला बचत गट कार्यरत असून त्यांची संख्या सात लाखांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. महिला उद्योजकांसाठी १५ लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुद्धा सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितले. महिला व बालकांविरोधातील अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी १०० विशेष जलद गती न्यायालयांना आवश्यक निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

ड्रोन दीदी आणि लखपती दीदी यादेखील योजना सुरु केल्या. सिंधुदुर्गात स्कुबा ड्रायव्हिंग सेंटर उभारणार त्यासाठी २२ कोटी रुपये, वेंगुर्ला येथे पाणबुडी प्रकल्पासाठी तरतूद ४४ कोटी रुपये, औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासाठी तरतुदी, कोकणातील कातळ शिल्पाच्या संवर्धनासाठी युनेस्कोकडे पाठपुरावा कार्यासाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ करण्याची घोषणा सरकारने केलेली माहिती सौ. सावंत यांनी दिली. त्यावेळी त्यांनी सरकारचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!